रत्नागिरी जिल्हा फोटो असोसिएशनतर्फे छायाचित्रण दिन‌ जल्लोषात साजरा!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओ असोसिएशनतर्फे 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनाचा औचित्याने जिल्ह्यात फोटोफेअर तसेच जिल्हा मेळाव्याचे आयोजन विविध तालुक्यात केले जाते. यावर्षीचा जागतिक छायाचित्रण दिन सोहळा गुहागर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक सचिनशेठ बाईत (अध्यक्ष चंद्रकला उद्योग समूह, आबलोली) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहिल आरेकर (अध्यक्ष सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर) आणि मान. मनोज बावधनकर (अध्यक्ष पत्रकार संघ गुहागर) हे होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून फोटोफेअरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर आणि रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय संजय शिंदे सर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, कार्याध्यक्ष गुरु चौगुले, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते, गुहागरचे तालुकाध्यक्ष समीर बावधनकर, तसेच प्रसिद्ध फोटोग्राफी प्रशिक्षक प्रमोद गायकवाड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर,पदाधिकारी व सर्व तालुका असोसिएशनचे यावेळी सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात सामुहिक प्रार्थना तसेच जिल्ह्यातील फोटोग्राफी क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जिल्हा संघटनेच्या वतीने फोटोग्राफर प्रगत, प्रशिक्षित आणि संघटित व्हावा यासाठी आयोजित केलेली शेकडो कार्यशाळा, वेबिनार तसेच सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर, तसेच फोटोग्राफरच्या अडीअडचणीमध्ये जिल्हा असोसिएशन करत असलेली मदत याची माहिती घेऊन मान्यवरांनी संघटनेबाबत गौरवोद्गार काढले. तसेच जिल्हा असोसिएशनने अगदी अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर असोसिएशन म्हणून नाव केल्याबद्दल सर्वांना अभिमान असल्याचे सांगितले.

स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्रात प्रसिद्ध छायाचित्रकार प्रशिक्षक मान. प्रमोद गायकवाड सर यांचे वेडिंग फोटोग्राफी या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मॉडेल घेऊन लग्नाची फोटोग्राफी उपलब्ध लाईटमध्ये कशी करावी? यावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर केक कटिंग करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील फोटोग्राफी संबंधित नामांकित कंपन्या आपले उत्पादन विक्रीसाठी उपस्थित होते. जिल्ह्यातील बहुसंख्य फोटोग्राफर देखील यावेळी हजर होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 22-08-2025