राजापूर बजरंग दलाने बांधले मोकाट गुरांच्या गळ्यात चमकणारे पट्टे

राजापूर : गेल्या काही वर्षापासून राजापूरवासीयांची मोकाट गुरांची समस्या चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी पालिकेने कारवाई करताना मोकाट फिरणारी गुरे पकडली होती. अद्याप ही समस्या जैसे थे आहे. त्यामुळे राजापूर बजरंग दलाच्यावतीने रस्त्यावर रात्री बसणाऱ्या मोकाट गाय व बैलाच्या गळ्यामध्ये प्रकाशात चमकणारे रेडियम नाईट ग्लो पट्टे बांधल्याची माहिती बजरंग दलाचे संयोजक निकेश पांचाळ यांनी दिली.

रेडियम पट्टे बांधण्यासाठी बजरंग दलाचे राजापूरचे संयोजक निकेश पांचाळ, सहसंयोजक संदीप मसुरकर, गोरक्षक प्रमुख अभिषेक पवार आणि बजरंगदलाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. शहरवासियांना मोकाट जनावरांची समस्या डोकेदुखी ठरलेली आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांच्या टोळक्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 22/Aug/2025