रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६५ गावं ‘हर घर जल’ गावे म्हणून घोषित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ४२६ ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेली आहे. मात्र, सध्या ३६५ गावांना ‘हर घर जल’ गावे माणून घोषित करण्यात आले आहे. आचारसंहितेत ग्रामसभा घेण्याचे बंधन आल्याने उर्वरीत गावे हर घर जल’पासून वंचित राहिली आहेत.

जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून ९ तालुक्यांमध्ये १ हजार ४३२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ४२६ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करूप्न, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.

जिल्ह्यात १ हजार ४३२ पैकी ४४५ योजनांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व योजनांचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. ४०० पैकी १०० योजना सुधारित घेण्यात आल्या असून त्या मंजूर होण्यासाठी शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा १ हजार १०० कोटींचा आराखडा होता, त्यामध्ये आत्ता सुधारित अंदाजपत्रकामुळे वाढ होणार आहे.

साधारण डिसेंबर २०२४ पर्यंत या सर्व योजना पूर्ण करण्याचा मानस जि. प. चा आहे. तसे आदेशही संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदारांना देण्यात आले आहेत. ठेकेदारांनी विलंब लावला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील जी नळपाणी योजनेची कामे सुरू आहेत. त्या ठेकेदारांना जिल्हा परिषदेमध्ये बोलवण्यात आले होते. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले आहे. अतापर्यंत ४२६ नळपाणी योजना पूर्ण झाल्या असल्या तरी ३६५ गावांना ‘हर घर जल’ घोषित करण्यात आले आहे. उर्वरीत गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता आल्याने पोषित करण्यापासून बंधन आले आहे. कारण ग्रामसभा होणे अपेक्षित आहे.

एका तासात होणार तक्रार निवारण
जल जीवन मिशनसंदर्भात अनेक तक्रारी जिल्हा परिषदकडे दाखल होत आहेत. विलंब काम, निकृष्ट दर्जांचे काम आदी तक्रारींचा समावेश आहे. जिल्हा परिषदने यासंदर्भात कडक भूमिका घेत टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. (०२३५२) ३५०७२७ या नंबरवर तक्रार केली तर एका तासात तक्रारीचे निवारण करण्यात येते. यामुळे या टोल फ्री नंबरवर नागरिकांनी तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी केले आहे.

पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार, अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. डिसेंबरअखेर जास्तीत जास्त योजना पूर्ण करण्यात येणार आहे. कीतींकिरण पुजार – (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 19/Oct/2024