रत्नागिरी : मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना लाभासाठी २७ पर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २७ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी या योजनांसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https:hmas.mahait.org या संकेतस्थळावर तत्काळ अर्ज भरून त्याची प्रत संबंधित वसतिगृहात, कार्यालयात जमा करावी, असे आवाहन सहायक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 22/Aug/2025