रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्यार्फे यंदाही थेट शाळेत जावून मुलींना पासेसचे वितरण केले. जून व जुलै या दोन महिन्यात अहिल्याबाई होळकर योजनेतून तब्बल ३२ हजार ७१६ मुलींनी या मोफत पासचा लाभ घेतला. तर १ कोटी २३ लाख ७८ हजार ७५० रूपांचा सवलत मिळाली. या योजनेचा सर्वाधिक लाभ चिपळूण, देवरूख, खेड, राजापूर तालुक्यात, तर सर्वात कमी लाभ मंडणगड, लांजा शाळेतील मुलीनी घेतला.
उन्हाळ्याच्या सुट्टयानंतर दरवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना एसटी पासेस शाळेत देण्यात आले. रत्नागिरी जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची यादी ९ आगार प्रमुखांकडे दिली होती. त्यानुसार मागणीनुसार एसटीचे अधिकारी स्वता शाळेत जावून मोफत पासेसचे वितरण केले तर काहीनी बसस्थानकात जावून पासेस घेतले. बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत पास दिला जातो. तर उर्वरित महाविद्यालयीन तरूण, तरूणींना पासमध्ये सवलत देण्यात आली. दरम्यान, दोन महिन्यात तब्बल ३३ हजार मुलींनी अहिल्याबाई होळकर योजनेतून पासेस काढून लाभ घेतला. बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींनसाठी ही योजना असून पासेसचा कालावधी संपल्यास पुन्हा मागणी केल्यास शाळेत पासेस देण्यात येत आहेत. तसेच बसस्थानकावर ही पासेस वितरीत करण्यात येत आहे.
अशी आहे सवलत
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास दिला जातो. ६६.६६ टक्के सवलत एसटी विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात दिले जाते तर ३३.३३ टक्के शुल्क भरून विद्यार्थ्यांना मासिक पास दिला जातो.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पाससाठी विविध शाळांनी मागणी केली होती. यावेळी एसटीचे अधिकारी, कर्मचारी स्वता शाळेत जावून पासेसचे वितरण केले. दोन महिन्यात ३२ हजार ७१६ जणांनी या मोफत पासचा लाभघेतला- बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 22/Aug/2025














