ICC Women’s World Cup 2025 Matches Shifted From Bengaluru To Mumbai : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ८ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा सुरु होण्याआधी ठरलेल्या नियोजनात बदल करण्याची वेळ आली आहे.
बंगळुरुच्या मैदानातील सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित
महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीसह अंतिम सामन्यासह साखळी फेरीतील लढती बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार होत्या. पण कर्नाटक सरकारने या मैदानात सामने खेळवण्यावर बंदी घातली आहे. IPL चॅम्पियन RCB च्या विजयी जल्लोष साजरा करताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. परिणामी ICC महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील बंगळुरुच्या मैदानातील नियोजित सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.
आता गुवाहटीच्या मैदानात रंगणार सलामीची लढत
३० सप्टेंबरला बंगळुरुच्या मैदानात रंगणारा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना आता गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येईल. याशिवाय इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ ऑक्सोटबरची लढत ही देखील याच मैदानात रंगल्याचे पाहायला मिळेल.
…तर नवी मुंबईच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार
२० ऑक्टोबरला कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यासह बंगळुरुच्या मैदानातील दोन लढती या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येतील. यात भारत विरुद्ध न्यूझीलं (२३ ऑक्टोबर) आणि भारत विरुद्ध बांगलादेश (२६ ऑक्टोबर) या सामन्यांचा समावेश आहे. जर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ फायनलच्या शर्यतीतून आउट झाला तर हा सामना भारतीय मैदानात खेळवण्यात येणार आहे. जो नवी मुंबईत खेळवला जाईल. याउलट पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये असेल तर अंतिम सामना हा कोलंबोच्या मैदानात खेळवला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 22-08-2025














