मंडणगड : परतीच्या पावसामुळे भातशेती आडवी

मंडणगड : मंडणगड तालुक्यात काल दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने मंडणगड शहरात साऱ्यांची धावपळ उडाली. ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसात विजेमुळे शहरातील अनेक दुकानातील इन्व्हर्टर व इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडल्या. त्यामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली व या दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

पावसाने ऑक्टोबर महिन्यात पूर्णपणे सुटी घेतल्याने गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात भातकापणीच्या मोसमास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकावर कालच्या पावसाने अक्षरशः पाणी फिरले आहे. शुक्रवारी दुपारनंतार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धुवाधार पावसाची सुरुवात झाली. सुमारे दोन ते अडीच तास न थांबता पाऊस पडत होता. त्यामुळे अनेकांच्या छत्र्याअभावी त्रेधातिरपीट उडाली. पावसाने आधीच अडचणीत असलेले भात व आंबा, काजूपिके मात्र अडचणीत आली आहेत. त्याचबरोबर विजा चमकल्यामुळे शहरातील दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 19/Oct/2024