लांजा : उबाठा ठाकरे गटाचे महावितरणला निवेदन

लांजा : गणेशोत्सवाच्या कालावधीत तालुक्यात महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत चालू राहावा तसेच स्मार्ट मीटरबाबत लोकभावना समजावून घेऊन त्यावर मार्ग काढावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले.

प्रतिवर्षीप्रमाणे काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी वारंवार खंडित होणारी वीजसेवा सुरळीत व्हावी तसेच स्मार्ट मीटरबाबत लोकभावना लक्षात घेऊन कारवाई करावी, याबाबतचे निवेदन देताना तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, महिला शहर संघटिका सिया लोध, उपतालुकाप्रमुख युवराज हांदे, उपशहरप्रमुख सागर वायंगणकर, विभागप्रमुख अशोक गुरव, विश्वास मांडवकर, उपविभागप्रमुख जितेंद्र कदम, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, महिला उपविभाग संघटिका दक्षिता राजापकर, उपविभाग संघटक धर्मेंद्र पालये आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 23/Aug/2025