चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक (ता. २३) आयोजित केली आहे. शहरातील खेंड कोलेखाजण येथील माऊली बैंक्वेट हॉलच्या सभागृहात ही बैठक माजी आमदार रमेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आमदार शेखर निकम यांना कडवी लढत दिली. अवघ्या ६ हजार ८०० मतांनी त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यातून यादव यांना मतांची आघाडी मिळाली होती. चिपळूण शहरातून ते आघाडीवर होते; मात्र आता यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे काही पडसाद शहरासह तालुक्यातही उमटण्याची शक्यता आहे. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पुन्हा एकदा बांधणी करावी लागणार आहे. त्याची सूत्रे साहजिकच माजी आमदार रमेश कदम यांच्या हाती येणार असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील व्यूहरचना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विश्वासात घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 23/Aug/2025














