चिपळूण : परिसरात पुराचे पाणी ओसरल्यानंतर येथील कळंबस्ते येथे प्रशांत घोरपडे यांच्या शेतात मगर आढळून आली आहे. वन विभागाने पिंजरा लावून ही मगर जेरबंद केली. ही मगर १२ फूट लांबीची असून तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. तसेच पाचाड येथे सहदेव चिले यांच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंड्यांमध्ये मोठा अजगर आढळून आला. वन विभागाने तो पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला.
मगर पकडण्यासाठी वन परीक्षेत्र अधिकारी एस. एस. खान, रामपूर वनरक्षक राहुल गुंठे, फिरते वनरक्षक पथक दत्ताराम सुर्वे, विशाल पाटील, प्रणीत कोळी, आबलोली वनरक्षक कुमार पवार आदींनी ही मगर पकडण्यात यश मिळवले. विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई, सहायक वनरक्षक प्रियांका लगड यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 23/Aug/2025














