रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनादरम्यान पाली गावात शासकीय जमिनीवर असलेल्या टपऱ्या चालकांचे मोठे नुकसान झाले होते. या टपऱ्या चालकांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून पालीतील ७३ टपऱ्या चालकांना ६४ लाख ९५ हजार ४८४ रुपयांचा मोबदला मंजूर करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवापूर्वी हा मोबदला मंजूर झाल्यामुळे टपऱ्या व खोकेधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई-गोवा महामार्गासाठी खासगी भूधारकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. परंतु शासकीय जागेमध्ये टपऱ्या असणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. गेली अनेक वर्ष शासकीय जागांवर हे खोकेधारक व्यवसाय करीत होते. याबाबत पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत हे प्रयत्न करीत होते. त्यामुळे आरवली, संगमेश्वर पट्ट्यातील अनेक खोकीधारकांना याचा लाभमिळाला होता. मात्र पाली परिसरातील खोकीधारकांना मोबदला मिळाला नव्हता. या खोकीधारकांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती.
काही दिवसांपूर्वीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या बैठकीत किरण सामंत यांनी पाली येथील खोकीधारकांची बाजू मांडत व्यक्त केली होती. यावेळी प्रांताधिकारी त्यांना मोबदला मिळावा अशी भूमिका जीवन देसाई यांनी याठिकाणच्या खोकीधारकांची केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 23/Aug/2025









