चिपळूण : भाजप पक्षाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच आपले मार्गदर्शक तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि मत्स्य व्यवसाय, विकास बंदरे तथा संपर्क मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उल्लेखनीय काम करूया. तसेच अंतर्गत स्नेह आणि सुसंवाद वाढवू. तुम्ही कधीही हाक द्या, मी आपल्यासाठी धावून येईन. कारण, प्रश्न कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आहे.
त्यामुळे विविध उपक्रम व कार्यक्रम हाती घेऊन पक्षाला अभिमान वाटेल असे काम उभे करूया, असे आवाहन भाजपा पक्षात नव्याने दाखल झालेले तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी केले. भाजपा उत्तर रत्नागिरीतर्फे चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढी सभागृहात प्रशांत यादव यांच्यासह अन्य प्रवेशकर्त्यांचे स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. उद्योजक प्रशांत यादव यांच्यासह बळीराम मोरे, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के व अभिनव भुरण यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर तालुका माजी अध्यक्ष निलेश सुर्वे, रत्नागिरी जिल्हा माजी सरचिटणीस श्रीराम इदाते, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 23/Aug/2025














