रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव २०२५ निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी महामार्गावरील प्रमुख ठिकाणी तसेच रेल्वे स्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार तपासणी पथके २२ ऑगस्टपासून कार्यरत होणार असून, ७सप्टेंबरपर्यंत सतत कार्यरत राहतील. ही तपासणी पथके महामार्गावरील चेकपोस्ट, प्रमुख फाटे तसेच रेल्वे स्थानकांवर कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्ट ठिकाणी पेंडॉल उभारण्यात येतील. त्या ठिकाणी आरोग्य विभागासह सर्व संबंधित विभागांचे कर्मचारी तैनात राहून तपासणी करतील.
प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधी साठा, प्रथमोपचार सुविधा राहील. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक केंद्रावर एक अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
तालुकानिहाय पथक ठिकाणे
पुढीलप्रमाणे –
खेड (३ केंद्रे)
गुणदे फाटा (पेंडॉल)
भरणेनाका (पेंडॉल)
खेड रेल्वे स्टेशन
चिपळूण (६ केंद्रे)
पेढे सवतसडादर्शन (पेंडॉल)
कळंबस्ते तिठा (पेंडॉल) बहादुरशेख नाका (पेंडॉल) अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट) दहिवली फाटा (पेंडॉल)
चिपळूण रेल्वे स्टेशन
संगमेश्वर (५ केंद्रे)
तुरळ (पेंडॉल)
एस.टी. स्टॅण्ड जवळील ब्रिजचे वळण (पेंडॉल)
वांद्री (पेंडॉल)
देवरुख मुर्शी (चेकपोस्ट) संगमेश्वर रेल्वे स्टेशन
रत्नागिरी (३ केंद्रे)
हातखंबा तिठा (पेंडॉल)
पाली (पेंडॉल)
रत्नागिरी रेल्वे स्टेशन
लांजा (२ केंद्रे)
वेरळ (पेंडॉल)
(पेंडॉल) कुवे गणपती मंदिर समोर
राजापूर (१ केंद्र)
राजापूर एस.टी. स्टॅण्ड (पेंडॉल) एकूण तपासणी केंद्रे : २०
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 23/Aug/2025














