टंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची गरज : नीलेश जगताप

राजापूर : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी आणि भविष्यातील टंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी केले.

जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि मुख्य संसाधन केंद्र, जे. पी. एस. फाउंडेशन, लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर शहरामध्ये दोनदिवसीय ‘जलसाक्षरता’ या विषयावर आयोजित प्रशिक्षणावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रशिक्षक हर्षदा वाळके, मंगेश नेवगे, आरती पाटील, धनाजी गुरव, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता महेश आरळेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले पाल्याचे मुल्य समजून घेण्यासाठी जलसाक्षरतेची गरज असून, योग्य शिक्षणातून साक्षरता येते. विशेषतः जेव्हा जलस्रोत समजून घेणे, व्यवस्थापित करणे आणि वापरणे या बाबी येतात तेव्हा शिक्षण अधिक महत्त्वाचे बनत आहे. या प्रशिक्षणात हर्षदा वाळके, मंगेश नेवगे, आरती पाटील, धनाजी गुरव, महेश आरळेकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात ग्रामपंचायत स्तरावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी सहभागी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 19/Oct/2024