राजापूर रेल्वेस्टेशनची रिक्षाचालकांकडून स्वच्छता

राजापूर : तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वेस्टेशन येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने रेल्वेस्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. राजापूर रोड रेल्वेस्टेशन येथे रिक्षास्टॅन्डला मंजुरी देण्यात आली असून, त्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष अनिल गुरव, कोरगावकर, सचिन पिलके, संजय लाड, दीपक सरवणकर, विजय घुमे, प्रदीप पुजारी यांच्यासहित संघटनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक, मालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 25/Aug/2025