सुरक्षित वाहन चालवा, काळजी घ्या : पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे

लांजा : वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात, ज्यामुळे रस्त्यावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. परिणामी, वाहतूककोंडी होऊन अपघातही घडत असतात. यासह रस्त्याकडेला विक्रेते अनेकवेळा त्यांचे व्यवसाय उभारतात, ज्यामुळे वाहनांसाठी जागा मर्यादित होते आणि वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवतो. वाहतूककोंडीची अनेक कारणे असली तरी आपण सज्ञान नागरिक आहोत. स्वतःसह दुसऱ्यांची काळजी घेऊन सुरक्षित वाहन चालवले तर वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही, असे प्रतिपादन लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी केले.

विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते वाहतूक समस्या आणि अमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम या विषयांवर मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी लांजा न्यायालयाच्या न्यायाधीश एस. आर. जोशी, लांजा पोलिस ठाण्याच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक देवकन्या मैदाड, अॅड. संपदा मुळ्ये उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 25/Aug/2025