रत्नागिरी : ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी २३ शिक्षकांच्या मुलाखती

रत्नागिरी : शिक्षकदिनी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची यावर्षीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी जिल्हाभरातील २३ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यावर्षी प्रत्येक तालुक्यामधून दोनपेक्षा जास्त प्रस्ताव सादर करण्यात आले होते. अंतिम मंजुरीसाठी अहवाल कोकण आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला असून, लवकरच पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून प्रत्येकी एका शिक्षकाला पुरस्कार देण्यात येतो. तसेच एका शिक्षकाला विशेष पुरस्कार अशा १० जणांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्हाभरातून २७ प्रस्ताव आले होते. त्यातील मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या २३ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरीय समितीने शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. या समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य यांचा समावेश होता. वास्तविक या समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात; मात्र सध्या प्रशासकीय राजवट असल्याने समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांना करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 25/Aug/2025