राजापूर तालुक्यात मुला-मुलींचा जन्मदर समाधानकारक

राजापूर : तालुक्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये ३ हजार ८८४ मुले जन्मली असून, त्यामध्ये मुलींच्या तुलनेमध्ये मुलांची संख्या जास्त आहे. मुला-मुलींचा जन्मदर तालुक्यात समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचा विचार करता गेल्या चार वर्षांमध्ये ८५२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. चार वर्षांमध्ये कुटुंबकल्याणच्या झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये केवळ दोन पुरुष कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली असून, तब्बल ८५० महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी पुरुषांची सकारात्मक मानसिकता नसल्याचे दिसत आहे. कोरोना महामारीत आरोग्य विभागाकडून ३ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांच्या शिबिरांचे आयोजन केलेले नव्हते. त्यामुळे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांची संख्या कमी होती. पुढे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांची शिबिरे सुरू झाली. त्यात शस्त्रक्रियांची संख्या वाढू लागली आहे. पुरुषांच्या शस्त्रक्रियांची संख्या वाढवण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी जन्मदराचा आढावा घेतला जातो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 19/Oct/2024