खेड : रसाळगडाच्या मार्गावर दरड कोसळली

खेड : ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याला जोडणारा मुख्य रस्त्यावर रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी मंगळवारी दुपारी १ वाजता दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. ही दरड कोसळली असल्याची माहिती तातडीने जिल्हा परिषद बांधकाम विभाग खेड यांना कळवण्यात आली आहे.

रसाळगड किल्ल्याच्या पायथ्यालगत जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावर धोक्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मांगणी मागील पाच वर्षांपासून जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांच्याकडे सातत्याने करण्यात येत आहे. परंतु, या अत्यावश्यक कामाची दखल जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांनी अद्याप घेतलेली नाही.

रसाळगड किल्ला हा क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केले आहे. घेरारसाळगड गावातील काही वाड्यांतील ग्रामस्थ वेगळ्या पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकमंत्री हे राजकीय हेवेदावे यामुळे रसाळगड किल्ल्याच्या विकासासाठी जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 26/Aug/2025