रत्नागिरी : पावसामुळे रेशनधान्य घेऊन जाण्यास लाभार्थ्यांना अडचणी येणार म्हणून राज्य शासनाने तीन महिन्याचे धान्य जून महिन्यातच वितरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचे धान्य वितरीत केले असून ८५ टक्के धान्य वाटप झाले आहे. आता ऑगस्ट महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. गौरी-गणपती सण अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपला असून कित्येकजण शिध्याच्या प्रतिक्षेत आहेत मात्र आनंदाचा शिधा यंदाही येणार नसून जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे अतिगरीब वर्गातील नागरिकांना रेशनधान्यविना सण साजरा करावा लागणार आहे.
गोरगरिबांना आनंदात सण साजरा करता यावे म्हणून १०० रुपयात दिवाळी, जयंती, उत्सवाच्या काळात महायुतीच्या काळात आनंदाचा शिधा वितरीत केला जातो. या शिधामध्ये रवा, साखर, चणाडाळ, पामतेल, मैदा अशा पाच जिनसा दिल्या जात होत्या. मागील दोन ते तीन वर्षापासून आनंदाच्या शिधा कीटचे वाटप जात होते. येथील गोरगरिब कुटुंबियांना आधार मिळत होता त्यामुळे सण उत्साहात साजरा होत होता. सणानिमित्त कित्येक जण शिध्याची वाट पाहत आहेत मात्र यंदाही आनंदचा शिधा वाटप केला जाणार नसून शिधा येणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोरगरिबांना संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचा पैसा त्याठिकाणीच खर्च होत असल्यामुळे शिवभोजनबरोबरच आता आनंदाचा शिध्यावर फटका वसत आहे. आनंदाचा शिधा किंवा दुसरे उपक्रम करून शिधा वाटप करावा अशीच मागणी होत आहे. जिल्ह्यात जुन, जुलै महिन्याचे धान्य वाटप झाले आहे. ऑगस्टचे सुरू असून उत्सवानंतर धान्य मिळणार असल्याचे सांगितले.
गणेशोत्सवात पूर्वीच जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचे धान्य वाटप पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याचे वितरण अद्याप पूर्ण झाले नसून, धान्य वाटप सुरू आहे. सरासरी ८५ टक्के धान्य वाटप झाल आहे. गौरी-गणपतीत आनंदाचा शिधा येणार नाही. त्यामुळे कोणतेही नियोजन केले नाही-रोहिणी रजपूत,जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 26/Aug/2025














