साडवली : देवरूख येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील गटात जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेद लिंगायत (प्रथम, १२वी वाणिज्य), भाग्यलक्ष्मी मुळे (द्वितीय, १२वी संयुक्त-वाणिज्य), प्रणीत मांडवे (चतुर्थ, १२वी वाणिज्य), साई हळदणकर (पाचवा, १२वी वाणिज्य) यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांनी जबाबदारी संभाळली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि पुढील स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 26/Aug/2025














