Mandangad: मुंडे महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक धोरण-2020’ उद्बोधन वर्ग संपन्न

मंडगणड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परीक्षा विभाग यांच्या वतीने व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “नवीन शैक्षणिक धोरण – 2020” वर विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील परीक्षाविभाग प्रमुख डॉ. शैलेश भैसारे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. सुरज बुलाखे, प्रा. प्रितेश जोशी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुरज बुलाखे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉ. अशोक साळुंखे यांनी विशय निवड संदर्भात थोडक्यात माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. शैलेश भैसारे यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम व व्दितीय वर्गतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात झालेले बदल तसेच त्याची उद्दिश्टे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यभिमुख शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे, व ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदयाचे आहे. जेणेकरुन पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीवर अलंबून न राहता विद्यार्थी स्वतःचे व्यवसाय सुरु करु शकतात. या धोरणामध्ये आंतरविषय निवड, बहुभाषिक शिक्षण या विषयाच्या तरतुदी विद्यार्थ्यांसाठी करुन दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सहा व्हर्टीकल व त्याअंतर्गत निवडले जाणारे विषय, परीक्षा पध्दती या विषयाची सखोल माहिती या उद्बोधन वर्गात देण्यात आली.

अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक असून त्याप्रमाणे आपली विषय निवड प्रक्रिया करणे सोपे होईल असे सांगताना या उद्बोधन वर्गास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरज बुलाखे यांनी तर शेवटी आभार प्रा. प्रितेश जोशी यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 26/Aug/2025