Asia Cup 2025 Update News : आशिया कप 2025 चा थरार सुरू होण्यासाठी आता फक्त दोन आठवडे बाकी आहेत. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले असून दोन्ही संघांनी आपापला संघ जाहीर केला आहे.
गट अ आणि गट ब मधील प्रत्येकी 3 संघांनी देखील आपले-आपले स्क्वॉड घोषित केले आहे.
आशिया कप 2025 मध्ये 9 ते 19 सप्टेंबरदरम्यान गट स्तरावरील सामने रंगणार आहेत. यात 8 संघांमध्ये एकूण 12 सामने खेळले जातील. प्रत्येक संघ आपल्या गटातील सर्व संघांविरुद्ध एक-एक सामना खेळेल. त्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन-दोन संघ ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश करतील, तर उर्वरित 4 संघांचे आव्हान इथेच संपेल.
कोणाच्या ताफ्यात आहेत धुरंधर खेळाडू, पाहा सर्व संघांची यादी एका क्लिकवर
भारतीय संघ (Team India Squad For Asia Cup 2025)
: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तान संघ (Pakistan Squad For Asia Cup 2025)
: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
अफगाणिस्तान संघ (Afghanistan Squad For Asia Cup 2025)
: रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, दरविश रसूली, सेदीकुल्ला अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
बांगलादेश संघ ( Bangladesh Squad For Asia Cup 2025)
: लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदयॉय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनझिम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, शैफ उद्दीन.
श्रीलंका संघ (Sri Lanka Squad For Asia Cup 2025) : अद्याप जाहीर झालेला नाही.
यूएई संघ (UAE Squad For Asia Cup 2025) : अद्याप जाहीर झालेला नाही.
ओमान संघ (Oman Squad For Asia Cup 2025) : जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, झिकारिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
हाँगकाँग संघ (Hong Kong Squad For Asia Cup 2025) : यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हन मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतिक उल रहमान इक्बाल, किंचिंत शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अर्शद, अली हसन, शाहिद वसीफ, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 26-08-2025














