मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ‘न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड’ (NIACL) मध्ये तब्बल ५५० प्रशासकीय अधिकारी (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स – स्केल I) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
या भरतीमध्ये जनरालिस्ट आणि स्पेशालिस्ट अशा विविध क्षेत्रांतील पदांचा समावेश असून, निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे ९०,००० रुपये प्रति महिना वेतन आणि इतर आकर्षक सुविधा मिळणार आहेत.
पदांचा सविस्तर तपशील (एकूण ५५० पदे)
कंपनीने विविध शाखांमधील एकूण ५५० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये सरकारी नियमांनुसार आरक्षण (अजा: १५%, अज: ७.५%, इमाव: २७%, EWS: १०%) लागू असेल.
- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरालिस्ट): १९३ पदे
- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (ऑटोमोबाईल इंजिनीअर्स): ७५ पदे
- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (बिझनेस ॲनालिस्ट): ७५ पदे
- रिस्क इंजिनीअर्स: ५० पदे
- लिगल स्पेशालिस्ट: ५० पदे
- हेल्थ स्पेशालिस्ट: ५० पदे
- अकाऊंट्स स्पेशालिस्ट: २५ पदे
- आयटी स्पेशालिस्ट: २५ पदे
- ॲक्च्युरियल स्पेशालिस्ट: ५ पदे
- कंपनी सेक्रेटरी: २ पदे
आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी विशिष्ट पात्रता आवश्यक आहे. जनरालिस्ट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, तर स्पेशालिस्ट पदांसाठी संबंधित विषयात (उदा. इंजिनीअरिंग, कायदा, वैद्यकीय, सीए, एमबीए-फायनान्स, आयटी) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (पात्रतेची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे).
- वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट मिळेल).
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाईल:
- फेज-१ (पूर्व परीक्षा): १४ सप्टेंबर २०२५ (अंदाजे) रोजी १०० गुणांची ऑनलाइन पूर्व परीक्षा होईल.
- फेज-२ (मुख्य परीक्षा): २९ ऑक्टोबर २०२५ (अंदाजे) रोजी २०० गुणांची ऑब्जेक्टिव्ह आणि ३० गुणांची वर्णनात्मक (डिस्क्रीप्टिव्ह) ऑनलाइन मुख्य परीक्षा होईल.
- फेज-३ (मुलाखत): मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण (७५% वेटेज) आणि मुलाखतीतील गुण (२५% वेटेज) यांच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा आणि केव्हा करायचा?
- अर्ज शुल्क: सर्वसाधारण उमेदवारांसाठी रु. ८५०/- आणि अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी रु. १००/-.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑगस्ट २०२५
- संकेतस्थळ: इच्छुक आणि पात्र उमेदवार केवळ ऑनलाइन पद्धतीनेच http://newindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
एका उमेदवाराला केवळ एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. मुदत जवळ आल्याने पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














