रत्नागिरी : कळझोंडी येथे उद्या भंते करुणाज्योती महाथेरो यांचे विशेष धम्म प्रवचन

गणपतीपुळे : बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा ९ रत्नागिरी, संस्कार समिती रत्नागिरी आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 11 मौजे कळझोंडी पंचशीलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २० ऑक्टोबर 2024 रोजी वर्षावास सांगता समारंभाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. कळझोंडी येथील पंचशील बुद्धविहारात हा कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बौद्ध धम्मगुरु भन्ते करुणाज्योती महाथेरो (मुंबई) यांचे प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या विशेष धम्म प्रवचनाने होणार आहे. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, चिटणीस रविकांत पवार, तालुका शाखेच्या विविध उप समित्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संस्कार समितीचे श्रामनेर, बौद्धाचार्य गाववार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील विविध गाव शाखांमध्ये वर्षावास कार्यक्रमांतर्गत धम्मप्रवचन मालिका घेण्यात आली. या धम्म प्रवचन मालिकेमध्ये संस्कार समितीचे ज्येष्ठ बौद्धाचार्य संजय आयरे, रविकांत पवार, सुवेश चव्हाण, संदीप जाधव आदींनी आपल्या धम्मप्रवचनातून धम्म प्रबोधन करण्याचे विशेष काम केले. तसेच तालुका शाखेच्या संस्कार समितीने तालुक्यातील गाव शाखांमध्ये वर्षावास हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करून खन्य अर्थाने धम्म विषयक जनजागृती करण्याचे काम केले आहे. एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाचा सांगता समारंभ कळझोंडी येथे आयोजित करून या कार्यक्रमात धम्मप्रवचन करणाऱ्या बौद्धाचार्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच कळझोंडी येथील गावशाखेच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान आणि स्वागत तसेच रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे सर्व सनद प्राप्त बौद्धाचार्य यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम कळझोंडी शाखेचे विद्यमान अध्यक्ष अनिल पवार गुरुजी यांच्या विशेष सौजन्याने घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धार्मिक पूजापाठ भंतें करुणाज्योती महाथेरो यांचे मंगलवाणीतून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बौद्ध धम्मगुरु भंते करुणाज्योती महाथेरो यांचे तालुका शाखा रत्नागिरीच्या वतीने आणि कळझोंडी गावशाखेच्या वतीने विशेष स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुक्यातील आणि 22 खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा गावशाखांमधील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि कळझोंडी गावशाखेचे अध्यक्ष अनिल पवार गुरुजी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 19/Oct/2024