Chiplun : संस्कार भारतीतर्फे ‘चला करूया गणपती’ कार्यशाळा

चिपळूण : कलाक्षेत्रातील नामवंत संस्था संस्कार भारती उत्तर रत्नागिरीतर्फे ‘चला करूया गणपती’ कार्यशाळा ज्येष्ठ रांगोळीकार व मूर्तिकार संतोष केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

सामाजिक कार्यकर्ते बापू काणे, संस्कार भारती अध्यक्ष शरद तांबे, महामंत्री मंगेश बापट, संतोष केतकर, आनंद पाटणकर, सोनाली खर्चे, अॅड. विभावरी रजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करून या कार्यशाळेचा शुभारंभकरण्यात आला. डॉ. अमेय भाव, आनंद पाटणकर, मेघना गोखले यांनी संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर केले. संतोष केतकर यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि सर्व प्रशिक्षणार्थिनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊ ते दुपारी ३ पर्यंत सुमारे ३५ छोट्या मोठ्या कलाकारांनी गणेशाच्या मूर्ती सुबकरीत्या साकारल्या.

यासाठी केतकर यांना सुनील खेडेकर, प्रा. सोनाली खर्चे यांनी मदत केली. चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनीही कार्यशाळेस भेट दिली. या कार्यशाळेसाठी शाडूची माती मूर्तिकार राजन लवेकर यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्कार भारतीचे अभय खांडेकर, विभावरी रजपूत, श्रीकांत फाटक, मंदार ओक, वीणा परांजपे, सुखदा परांजपे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बापू काणे आदींचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 28-Aug-25