पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आठवीसाठी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून अनुक्रमे पाच हजार रुपये आणि सात हजार रुपये देण्यात येतात. पाचवी आणि आठवीसाठी ५० गुणांची प्रथम भाषा, १०० गुणांची गणिताची अशी एकूण १५० गुणांची परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. तर, ५० गुणांची तृतीय भाषा, १०० गुणांची बुद्धिमत्ता चाचणीसाठीची १५० गुणांसाठीची परीक्षा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 19-10-2024