रत्नागिरी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकांसंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकांचा धडाका लावला आहे. या बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. न.प. प्रभागानुसार पुढील बैठका घेण्याबाबत आढावाही घेण्यात आला.
शिवसेना उपनेते तथा माजी आम. बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक माजी खा. विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, प्रकाश जाधव, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, मा. नगरसेविकारशिदा गोदड यांच्यासह तालुक्यातील व शहरातील सर्व विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित होते.
रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक संदर्भात गण/प्रभाग निहाय आढावा बैठकांचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 29-Aug-2025













