Ratnagiri : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ठरतेय वरदान

रत्नागिरी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात जाली. मागील सात वर्षापासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजारहून अधिक गोरगरियांनी या योजनेचा लाभ घेवून उपचार करून घेतले. त्यामुळे ही योजना आर्थिकरष्टया दुर्बल असलेल्या गोरगरीब रुग्णांची आधार बनली आहे. त्यामुळे या योजनेची आणखीन जनजागृती होणे गरजेची असून जनजागृती झाल्यास गावे, खेडयापाडयातील, दुर्गम भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारचीआरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत कार्यद्वारे आर्थिकष्टया दुर्बल नागरिक रूग्णालयात जावून ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहे.

ही योजना २०१८ सालापासून सुरुवात झाली. देशभरातून कोट्यावधी गरीब, गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तर रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो, लाखो रूग्णांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेवून उपचार घेतले. पूर्वी उपचाराची मर्यादा होती, त्याचबरोबर विमाकवच कमी होते. आता हृदय , मेंदू , किडनीसह अन्य आजारावर उपचार, शस्त्रक्रिया या योजनेतून होत आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयात होणारा लाखोंचा खर्च गरिब रुग्णांचा वाचला आहे. आयुष्णमान भारत, आयुष्यमान वय वंदना कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर है आवश्यक आहे. तक्रार असल्यास टोल फ्री, वेबसाईटवर तक्रार निवारण होईल. त्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे तसेच मोठ्या प्रमाणात या योजनेगी जनजागृती होणे गरजेची आहे.

या योजनेतून १,३५६ आजाराचे उपचार होतात. यात हदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, बालरोग, नेत्ररोग, जठर, स्त्रीरोग शस्त्रक्रियासह विविध आजारांचा समावेश आहे.

३१ ऑगस्टपर्यंत आयुष्यमान भारात योजनेतून कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनी आयुष्यमान गोल्डन कार्ड काढून घ्यावे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे –डॉ. प्रवीण गुरूले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 29-Aug-2025