रत्नागिरीतून परतीसाठी खासगी बसेसचे दर अव्वाच्या सव्वा

रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच उत्सवासाठी आलेले मुंबई व पुणेकर गणेशभक्तांची परतण्याच्या दृष्टीने तिकीटांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. खासगी लक्झरी गाड्यांची तिकीटे तर दोन अडीच हजारच्या घरात गेली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात लाखो गणेशभक्त मुंबई व पुण्याहून दाखल झाले आहेत. दोन दिवसापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरीभागात आरत्या, भजने, जाकडी सारख्या कार्यक्रमांनी रंगत आणली आहे. टाळ मृदुंगांच्या आवाजाने भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात उत्सवासाठी आलेले गणेशभक्त आता माघारी परतण्याची व्यवस्था पाहू लागले आहेत. अनेक भक्तांनी परतीची तिकीटे बूक केली आहेत. तर अनेक जण परतीच्या तिकीटांसाठी माहिती घेत आहेत. रेल्वेच्या गाड्या आधीच फुल्ल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई व पुणेत परतण्यासाठी जवळपास दोन हजारहून अधिक एसटी बसेस बूक झाल्या आहेत.

जिल्ह्यातून नियमित चालणाऱ्या खासगी बसेस व अन्य खासगी बसेसही बाहेरुन आणून चालवल्या जात आहेत. मात्र तिकीट दर आता वाढले आहेत. प्रशासनाने नेमून दिलेल्या टेरीफ दरापेक्षाही अधिकचे दर लावले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 29-Aug-2025