Sham Pawar : मालगुंडचे शिक्षक शाम पवारांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कला शिक्षक शाम पवार यांचा महाराष्ट्र राज्य शाहू-ज्योती सामाजिक फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या पुरस्काराचे वितरण इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे एका शानदार समारंभात करण्यात आले.

कला अध्यापक शाम पवार हे गेली अनेक वर्षे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड मध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय रेखकाला परीक्षा त्यामध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांसाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला शाहू-ज्योती सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे, मुख्य आयोजक विकास उबाळे, पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, अभिनेत्री चित्रा दीक्षित, अॅड. नीता शेळके, व्याख्यात्या आम्रपाली पारवे, सचिन देवरे, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी गावडे, सुवर्ण पदक विजेते हिमांशु जैन, लावणी कलावंत डॉ. विद्याश्री यमचे, पूजा माळी, सुप्रसिद्ध अभिनेत्री भक्ती साधू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 29-Aug-2025