चिपळूण : रत्नागिरी येथे नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. हे पोलिस ठाणे आता सहाय्यक पोलिस आयुक्त हार्बर विभाग (मुंबई) यांच्या अंतर्गत काम करणार आहे. या पोलिसांच्या अंतर्गत दीडशे पोलिस कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची सुरक्षा पाहणार आहेत. भविष्यात कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे विलिनीकरण झाले, तरी राज्य सरकारची ही सुविधा प्रवाशांसाठी कायम राहणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहेत.
बदलत्या परिस्थितीनुसार, रेल्वे विभागात होत असलेले बदल, प्रवाशांची वाढती संख्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हार्बर लोहमार्ग परिमंडळ, कोकण लोहमार्ग विभाग तसेच रोहा, रत्नागिरी आणि कणकवली या ठिकाणी नवीन लोहमार्ग पोलिस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव अपर पोलिस महासंचालकांनी (नि. व. स.), महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला गृहविभागाकडून मान्यता मिळाली. त्यानुसार रत्नागिरी येथे हे पहिले पोलिस ठाणे सुरू झाले आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या पोलिस ठाण्याचे उद्घाटन पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते झाले. उत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर गर्दी होते. त्या वेळी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेकडून जादा कर्मचारी मागून घेते. त्यासाठी कोकण रेल्वेला वेगळे पैसे भारतीय रेल्वेकडे भरावे लागतात; मात्र आता पोलिस ठाणे झाल्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल
रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलिस ठाणे सुरू झाले, ही बाब कोकणवासीयांसाठी आनंदाची आहे. लोहमार्ग पोलिस ठाण्यांतर्गत आता केवळ प्रमुख रेल्वेस्थानकावर सुरक्षा न देता कोकण रेल्वेमार्गावरील लहान-मोठ्या सर्वच स्थानकांवर किमान एक पोलिस कर्मचारी सेवेत असावा, अशी अपेक्षा आहे-सुजय सावंत देसाई, खेर्डी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:03 PM 29-Aug-2025











