मुंबई: Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केले आहेत.
२९ ऑगस्ट, २०२५: आज मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट आहे.
३० ऑगस्ट, २०२५: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे ‘यलो’ अलर्ट कायम आहे.
३१ ऑगस्ट, २०२५: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ‘यलो’ अलर्ट कायम राहणार आहे.
१ सप्टेंबर, २०२५: या दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
२ सप्टेंबर, २०२५: मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांना हवामानातील बदलांनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ‘ऑरेंज’ अलर्ट असलेल्या भागातील लोकांनी अधिक सतर्क राहावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 29-08-2025














