लांजा : तालुक्यातील पूनस ग्रामपंचायत व वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पूनस आरोग्य वर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मुक्त भारत अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पूनस ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात १०८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
पूनस गावचे सरपंच संतोष लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली हे आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ. संदीप उगवेकर, समता फाउंडेशनचे केंद्र समन्वयक नितीश शेट्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सुपरवायझर मंगेश पाटील व नीलेश हंगे, एक्स-रे टेक्निशियन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, डॉ. शिवराज धवळे, आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव, आरोग्य सहायक स्नेहल झगडे, सूरज सोळंकी, क्षितिजा लोखंडे, प्रणाली गोरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पूनस उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू सुधीर लिंगायत, शुभम कांबळे, एएनएम प्रीती कांबळे यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. पूनस ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रश्मी सावंत, ग्रामपंचायत अधिकारी प्रभोध किर, संतोष साळवी, प्रमोद गुरव, सर्व आशासेविकांनी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:27 PM 29-Aug-2025











