रत्नागिरी : संकल्प कलामंच आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणधारा काव्यमैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत ऋतुजा उमेश कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
संकल्प कलामंच आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणधारा काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कविता वाचन करणाऱ्या प्रथम तीन विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले. स्पर्धेत अर्चना देवधर यांनी द्वितीय क्रमांक, तर वृषाली टाकळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी शाखेचे प्रमुख गुरुदेव नांदगावकर यांनी परिश्श्रम घेतले.
ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभागप्रमुख अरुण मौर्य यांनी संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनयराज उपरकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी विनयराज उपरकर, आण्णा वायंगणकर, उपाध्यक्षा रक्षिता पालव व बाबा साळवी उपस्थित होते. वायंगणकर यांनी स्वरचित कविता सादर केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:59 PM 29-Aug-2025











