Ratnagiri: फळबाग लागवडीत ५६३ जणांनी घेतला योजनेचा लाभ

रत्नागिरी : मनरेगा कार्यक्रमातून फळबाग लागवड, तसेच बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. गेल्या तीन वर्षांत जिल्हा परिषदेद्वारे राबविलेल्या या कार्यक्रमात लाभार्थी संख्येत मात्र घट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ७३४ लाभार्थ्यांनी फळबागेसाठी लाभ घेतला तर २०२४ -२५ मध्ये केवळ ५६३ जणांनी योजनेचा लाभ घेतला.

मनरेगा कार्यक्रमांतर्गत या आंबा, काजू, नारळ फळपिकांसाठी कलमे व रोपे यांची लागवड करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची विहित प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. गावोगावी या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांद्वारे जनतेशी संपर्क साधण्यात येतो

शासकीय योजना जास्तीत जास्त चांगल्या स्वरुपात राबवल्या जाव्यात याकरिता यंत्रणेचे प्रयत्न असतात. जिल्ह्यात यापूर्वी फळबाग लागवड योजनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. गेल्या 3 वर्षांत १९०३ लाभार्थ्यांनी १००३.४० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. मात्र, हा आलेख घसरला आहे. पहिल्या वर्षी ३४९ दुसऱ्या वर्षी ३१२ तिसऱ्या वर्षी ३०१ हेक्टर असे घसरते आकडे नोंदवले गेले आहेत. यावरून लागवडीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

फळपीक लागवड कार्यक्रम

सन लाभार्थी लागवड (हेक्टरमध्ये)

२०२२-२३- ७३४- ३८९.६९

२०२३-२४ – ६०६- ३१२.५५

२०२४-२५- ५६३- ३०१

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:45 PM 29-Aug-2025