रत्नागिरी : अवघ्या काही दिवसांवर आलेला दिवाळीचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकरांनी रोटरी वुमेन्स शॉपिंग फेस्टला पहिल्याच दिवसापासून गर्दी केली आहे.
घर सजावटीच्या अप्रतिम वस्तू,खास मिर्झापूर मधून आलेले घरातील शोभा वाढवणारे हॅण्डमेड कारपेट, इनडोअर आउटडोअर झाडे,नव्या शैलीचे कपडे,सुंदर मनमोहक साड्या,लहान मुलांचे कपडे,आर्ट गॅलरी,पर्सेस व पाउचेस, इमिटेशन ज्वेलरी, टेराकोटा ज्वेलरी,फॅब्रिक ज्वेलरी,ऑक्सिडाईस ज्वेलरी,ब्युटी प्रॉडक्ट्स , मनमोहक साड्या व ब्लाउज,आकर्शक कंदील, पणत्या,फराळ,साबण,उटणे,अत्तर,शुद्ध ऑरगॅनिक,नॅचरल खास दिवाळी साठी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आणि गिफ्टस खरेदी करण्यात ग्राहक रममाण झालेले दिसून आले.घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने आबालवृद्ध आवर्जून खरेदीसाठी प्रदर्शनाला भेट देत आहेत.
हे प्रदर्शन आज रविवार २० पर्यंत खुले राहणार असून,गर्दी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत खुले राहणार आहे.
खाद्यपदार्थाचा आस्वाद या शॉपिंग फेस्ट मधे हॉल २ मधे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने नागरिक चवदार खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत या मधे पावभाजी,शेठजी मिसळ,वडे,खिमा मिसळपाव,व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी,कबाब,चायनीज पदार्थ ,वेगवेगळे चाट,केक आणि ब्राउनी आणि बरेच काही पदार्थानचा समावेश आहे.
*वुमन शॉपिंग फेस्टिव्हल कधी पर्यंत : १८ ऑक्टोबर ते रविवार २० ऑक्टोबर*
केव्हा : सकाळी १० ते रात्री १०
कुठे : जयेश मंगल कार्यालय,थिबा पॅलेस रोड,रत्नागिरी.









