MEMU Train : चिपळूण-पनवेल दरम्यान धावणार मेमू विशेष गाड्या

चिपळूण : गणेशोत्सव काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण-पनवेल-चिपळूण दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 3 व 4 सप्टेंबर रोजी धावणार आहेत.

चिपळूण-पनवेल मेमू (गाडी क्रमांक 01160) बुधवार, दि. 3 व गुरुवार, दि. 4 सप्टेंबर रोजी चिपळूणहून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल-चिपळूण मेमू (गाडी क्रमांक 01159) 3 व 4 सप्टेंबर रोजी पनवेलहून सायंकाळी 4:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:55 वाजता चिपळूणला पोहोचेल. ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल. एकूण 8 कोच असलेली ही गाडी प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 30-Aug-2025