रत्नागिरी, Ratnagiri : हवामानात झालेल्या बदलामुळे मागील दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. आतापर्यंत 93 टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. थांबूनथांबून पाऊस पडत होता. मात्र, पावसाची रिमझिम कायम होती. मागील चौवीस तासात जिल्ह्यात 197.79 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मंडणगड 11, खेड 13, दापोली 13, चिपळूण 17.67, गुहागर 11.60, संगमेश्वर 24, रत्नागिरी 28.77, लांजा 56, राजापूर 22.75 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात 93 टक्के पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 30-08-2025











