लांजा : गणपतीचे दर्शन घेऊन गावातीलच एका मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेले दोन तरुण मंदिराकडे जाताना वाटेतच असणार्या ओढ्यात वाहून गेले. यातील एकजण झाडाच्या आधारामुळे बचावला तर 32 वर्षीय दुसरा तरुण पाण्यात बेपत्ता झाला असल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे घडली.
केतन श्रीपत खेगडे (32, रा. प्रभानवल्ली गोसावीवाडी, सध्या रा. कल्याण, मुंबई) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे तर मिलिंद विजय खेगडे (28, रा. प्रभानवल्ली) हा पाण्याच्या प्रवाहाने तब्बल 1 कि.मी. अंतर वाहून जात असताना झाडांच्या आधार घेऊन बचावला असून, त्याला अधिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे तर बेपत्ता केतन या घटनेची माहिती मिळताच प्रभानवल्ली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी झालेल्या मिलींद याला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर बेपत्ता केतन खेगडे याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेची माहिती लांजा पोलीस व तहसीदारांंना दिली. माहिती मिळताच लांजा तहसीलदार प्रियांका ढोले तसेच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व बचाव पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू ठेवली आहे. मात्र शुक्रवारी सांयकाळी उशिरापर्यंत ओढ्याच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या केतन खेगडे याचा शोध लागला नव्हता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 30-08-2025











