दापोली : येथील न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एचआयव्ही, एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एल. पी. पाटील होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग नियंत्रण व हेल्थकेअर केंद्राचे तज्ज्ञ समुपदेशक पांडुरंग उबाळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी बी. बी. ढवळे, सूत्रसंचालन मानसी कोवळे, तर आभार प्रदर्शन प्रा. युवराज आग्रे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 30-Aug-2025











