मेष: आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान – सन्मान होतील. दुपार नंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल.
वृषभ: आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल.
मिथुन: आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो.
कर्क: आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
सिंह: आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे.
कन्या: आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल.
तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल.
वृश्चिक: आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल.
धनु: आजचा दिवस व्यापार – व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो.
मकर: कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपार नंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल.
कुंभ: आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे.
मीन: आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 30-08-2025














