Chiplun : सावर्डे बाजारपेठेत खासगी बस दुकानाच्या कठड्यावर आदळली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस डावीकडील लेन सोडून भरधाव वेगात उजव्या बाजूला येऊन एका दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने घटनास्थळी कुणी नसल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

सावर्डे बाजारपेठेत पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसचालकाचे नियंत्रण सुटून मुंबईच्या दिशेने धावणारी बस अचानक रस्ता सोडून उजव्या बाजूला भरधाव वेगाने गेली. दुभाजकावर डिव्हायडरवरून थेट उजव्या बाजूकडील पथदीपाच्या खांबाला धडक देऊन ही बस सर्विहस रोडलगत असणाऱ्या एका दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. सावर्डे बाजारपेठेमध्ये दिवसभरात खरेदीसाठी गर्दी असते. सुदैवाने हा अपघात पहाटे घडल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यामध्ये लक्झरी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून काही दुकान गाळ्यांचे देखील नुकसान झाले आहे.

या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 30-Aug-2025