Chiplun : चिपळुणातील नामदेव शिंपी समाज सभागृहासाठी २५ लाखांचा निधी

चिपळूण : शहरातील श्री नामदेव शिंपी समाजासाठी स्वतंत्र सभागृह असावे अशी मागणी होती. निवडणुकीच्या काळात आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आलेली ही मागणी त्यांनी मान्य केली होती. दिलेला शब्द पाळत त्यांनी नगर विकास विभागाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था योजनेंतर्गत सभागृह उभारणीसाठी तब्बल २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ, चिपळूणतर्फे आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विवेक रेळेकर, सेक्रेटरी संतोष होमकर, प्रसाद आवळे, अंकुश आवळे, प्रफुल्ल रेळकर, चेतना होमकर, विद्या रेळकर यांच्यासह श्री नामदेव शिंपी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 30-Aug-2025