चिपळूण : गणेशोत्सवातील गौरीच्या सणानिमित्त चिपळूण नगरपरिषदेच्या कामकाजाची वेळ सकाळी ८ ते १२ अशी करण्यात आली असून, सकाळच्या सत्रात सणानिमित्त या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दुपारनंतर नगर परिषदेच्या कार्यालयास विशेष सुट्टी देण्यात आली आहे. तसेच ४ सप्टेंबर रोजी नगर परिषदेत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवानिमित्त प्लास्टीक मुक्त चिपळूण विषयावर आयोजित देखावा व प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. गौरी सणानिमित्त १ सप्टेंबर रोजी कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 30-Aug-2025












