रत्नागिरी : शांघाई (चीन) येथे २०२६ मध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतातील पात्र उमेदवारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड होणार असून इच्छुकांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास केंद्राने केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली असून उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ (किंवा काही क्षेत्रांसाठी २००१) नंतरचा असणे आवश्यक आहे. ही स्पर्धा व्यावसायिक कौशल्यासाठी ऑलिम्पिकसदृश असून जगभरातील तरुणांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 30-Aug-2025












