रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) च्या कामकाजाकरीता तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक नेमण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सचिव, आय. एम.सी. द्वारा शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था दापोली, मु. पो. जालगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी ४१५७१२ या संस्थेच्या पत्त्यावर ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे एम.बी. गवई, सचिव, आय.एम.सी ऑफ आयटीआय दापोली यांनी कळविले आहे.
या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३८ वर्ष असून शैक्षणिक अर्हता पदवीधर, एमसीआयटी, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी असणे आवश्यक आहे. किमान दोन वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव व ऑनलाईन कामकाज हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे. दरमहा १२ हजार रुपये मानधन देण्यात येईल. नियुक्तीचा कालावधी ११ महिने राहिल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 30-Aug-2025












