‘आर्थिक अंदाजपत्रक’ हा अर्थव्यवस्थेचा मुख्य दस्तावेज : यशवंत बर्वे

चिपळूण : ‘आर्थिक अंदाजपत्रक’ हा अर्थव्यवस्थेचा मुख्य दस्तावेज आहे.अर्थव्यवस्थेची दशा व दिशा निश्चित करण्यासाठी अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा आराखडा आहे. यामध्ये व्यक्ती, समूह, संस्था, व्यावसायिक तसेच देशाला आर्थिक नियोजन करत असताना याचा अतिशय उपयोग होतो. अशी माहिती शहरातील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यशवंत उर्फ राजा बर्वे यांनी दिली. येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स फोरम या विभागांतर्गत ‘आर्थिक अंदाजपत्रक’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. आर. इंगळे यांनी करून दिला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बापट, उपप्राचार्य प्रा. स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका प्रा. सुजाता खोत, सहसमन्वयक अविनाश पालशेतकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत प्रा. एम. एल. निपाने, सूत्रसंचालन प्रा. सोनाली खर्चे, तर आभार प्रदर्शन प्रा. दिशा दाभोळकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 30-Aug-25