संगमेश्वर : संगमेश्वरजवळील माभळे येथील गणपती मंदिराला १९२ वर्षांचा इतिहास आहे.
आता श्री गणपती मंदिराची देखभाल करत असलेले प्रभाकर भिडे यांची ही पाचवी पिढी आहे. यांच्या घराशेजारील जागेवर खासगी मंदिर आहे. आज काळानुरूप देवळाची रचना बदलली आहे.
या मंदिराची स्थापना (कै.) गंगाधरराव भिडे यांनी छोटीशी घुमटी बांधून केली. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजेच (कै.) सदाशिवराव, (कै.) पुरुषोत्तमराव व (कै.) नारायणराव यांनी अखंड श्रीगणेशाची सेवा केली. दरवर्षी श्रीगणेश चतुर्थीचा उत्सव गौरी-गणपती विसर्जनापर्यंत साजरा केला जातो. याबरोबरच या मंदिरात गौरीपूजनादिवशी (हवसतात त्या दिवशी) गावातील महिला भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच, या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या माताभगिनी मंगळागौरीतील खेळ खेळून साजरा करतात. या मंदिराविषयी अधिक माहिती सांगताना प्रभाकरपंत यांनी सांगितले, की मंदिर स्थापन केले तेव्हा छोटीशीच घुमटी होती, जी काही काळानंतर सुधारून मंदिर स्वरूपात आणली. भिडे स्वतःची एसटीमधील नोकरी सांभाळून सेवेत कधीही खंड पडू दिला नाही. मंदिरात गणपतीव्यतिरिक्त शिवशंकर, हनुमान, संतोषीमाता, दत्तगुरू अशा एकूण पाच देवी-देवतांची स्थापना केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 30-08-2025












