संगमेश्वर : तालुक्यातील माखजन बसस्थानकात गेले कित्येक वर्षे उपहारगृह बंद स्थितीत होते. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत असे. ही प्रतीक्षा गणेश चतुर्थी पूर्वी संपली आहे. येथील उपहारगृह नव्या दमाने सुरु झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.
सदर उपहारगृह हे उदय आंब्रे यांनी सुरु केले असून माखजन बसस्थानक व्यव्स्थापक श्री चव्हाण यांच्या हस्ते फित कापून नव्याने उदघाटन करण्यात आले. यावेळी बशीर खतीब, संतोष पाडळकर, सतीश साठे, प्रशांत रानडे, शैलेंद्र धामणस्कर, मोहन दळी, मंगेश दळी, संदेश पंडित आणि प्रवासी वर्ग उपस्थित होता.
माखजन बसस्थानकात येणाऱ्या नुसत्या प्रवाशांचीच गैरसोय नव्हे तर येथे वस्तीला येणाऱ्या पुणे माखजन, चिपळूण माखजन अशा गाड्यांच्या चालक व वाहकांची होत असे. सकाळी. पहाटे मार्गस्थ होणाऱ्या माखजन पुणे बस च्या चालक वाहकांना साधा चहा देखील उपलब्ध होत नसल्याने त्याची गैरसोय होत असे. माखजन बस स्थानकाच्या आजूबाजूला तशी दुकाने नसल्याने, प्रवाशांना लागणाऱ्या वस्तू, लहान मुलांना लागणाऱ्या खाऊच्या गोष्टी, व प्रवाशांची नाश्त्याची सोय होत नसे.बसस्थानकात उपहारगृह सुरु झाल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 30-Aug-2025












